सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

युवकांसाठी ग्रामीण भागात रोजगार निर्मितीच्या अपरंपार संधी

ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे आयोजित ज्ञान गाथा या कार्यक्रमात सूक्ष्म व ग्रामीण उद्योगांसाठी खादी ग्रामोद्योग मंडळाच्या योजना या विषयावर बोलताना खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे संचालक डॉ. सी. पी. कापसे.

Snehal Joshi . सौजन्य- ग्रामायण प्रतिष्ठान
  • Aug 24 2020 11:24PM
ग्रामायण प्रतिष्ठान नागपूरतर्फे फेसबुक लाईव्ह अंतर्गत 'ज्ञान गाथा ' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते 'सूक्ष्म व ग्रामीण उद्योगांसाठी खादी ग्रामोद्योग मंडळाच्या योजना' या विषयावर बोलत होते. दर रविवारी 'ज्ञान गाथा' मध्ये तज्ञाद्वारे एका विषयावरील ज्ञान आणि कौशल्यावर आधारित माहिती या सत्रामध्ये दिल्या जाते. डॉ. कापसे म्हणाले, खादीच्या लहानशा चरख्यापासून सुद्धा रोजगाराची निर्मिती होऊ शकते. ग्रामीण भागातील अनेक शेतीपूरक उद्योगांसाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अनेक योजना उपलब्ध आहेत. त्याद्वारे मिळणाऱ्या सबसिडीचा लाभ तरुणांनी घेतल्यास ग्रामीण भागातील युवक नक्कीच रोजगाराची निर्मिती करू शकेल. गावातील तरुणाला यामुळे तालुका पातळीवर स्थलांतरित होण्याची सुद्धा गरज भासणार नाही. ग्रामीण भागात उद्योगाची निर्मिती करण्याची क्षमता असल्याने गांधीजींनी दिलेला 'खेड्याकडे चला' हा नारा नवं उद्योजकांसाठी अतिशय महत्वाचा झाला आहे, असेही ते म्हणाले. याशिवाय, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या विविध योजनांची त्यांनी विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले, मध, बांबू, कृषी उद्योग, अभियांत्रिकी, कापड उद्योग, कुंभारकाम आदी क्षेत्रात उद्योग निर्मितीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. याकरिता 'स्कीम ऑफ फंड फॉर रिजनरेशन ऑफ ट्रॅडिशनल इंडस्ट्रीज' (स्फुर्ती) या सारख्या अनेक योजना आयोगाने आखल्या आहेत. नवं उद्योजक आयोगाच्या www.kvic.gov.in या संकेतस्थळाला भेट देत कर्जासाठी अर्जसुद्धा करू शकतो. बँकेला नियमानुसार ४५ दिवसांच्या आत अर्ज मान्य करणे बंधनकारक आहे, असेही ते म्हणाले. डॉ. कापसे यांचे मार्गदर्शनपर हे संपूर्ण व्याख्यान ग्रामायण प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवर आणि युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे. त्याचा लाभ प्रेक्षकांनी घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार