सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्र व्यायामशाळा' दगडफेक प्रकरणातील आरोपी जामिनावर झाले मुक्त*

दगडफेक प्रकरणातील आरोपी जामिनावर झाले मुक्त*

Sudarshan MH
  • Jun 16 2023 9:42AM

नंदुरबार - महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात झालेल्या दगडफेक व दंगल प्रकरणी पोलिसांनी आरोपी केलेल्या  सहा जणांना उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने आज दिनांक 15 जून 2023 रोजी जामीनावर सुटका केली. घटना घडल्यापासून त्यांना अटकेत ठेवण्यात आले होते.

याविषयी अधिक वृत्त असे की,  नंदुरबार शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात  काही दिवसांपूर्वी रात्री अचानक धर्मांध जमावाने तुफान दगडफेक करीत दहशत माजविली होती. तुफान दगडफेक करून दंगल माजवू पाहणाऱ्या समाजकंटकांच्या त्या गटाला पोलिसांनी वेळीच यशस्वीपणे आटोक्यात आणले व जातीय दंगलीच्या धोक्यातून शहराला वाचविले. ती कारवाई करताना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक किरण कुमार खेडकर व शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह दोन कर्मचारी जखमी झाले होते.  पोलिसांना लक्ष बनवून दगड बाटल्याचा मारा करण्यात आल्याचे त्याप्रसंगी सर्वांना पाहायला मिळाले. परंतु मुस्लिम समाजातील मुलीशी विवाह केल्यावरून अमोल कुंभार याच्याशी वाद झाला आणि पुढील प्रसंग उद्भवला असे दर्शवणारी फिर्याद धर्मांधांकडून देण्यात आली आणि पोलिसांनी त्यानुसार कारवाई करत अमोल कुंभार यांच्यासह 5 जणांना आरोपी करून अटक देखील केली होती. तेव्हापासून त्यांच्या नातलगांनी त्यांना जामीनावर सोडण्यासाठी प्रयत्न चालवले होते. या आरोपींच्या वतीने संभाजीनगर खंडपीठात एडवोकेट रुचीर वाणी आणि नंदुरबार न्यायालयात एडवोकेट धनराज गवळी यांनी कामकाज पाहिले. त्यांनी केलेले युक्तिवाद ऐकून आज दिनांक 15 जून 2023 रोजी संभाजीनगर येथील खंडपीठाने त्यांना जामीनावर मुक्त केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार