सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पंतप्रधानाच्या सभास्थळापासून ATM मशीन चोरी, ७ मे रोजी होणार आहे मोदींची सभा

शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिनांक ७ मे रोजी सभा होणार असून या सभेच्या ठिकाणापासून अर्ध्या किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर ही घटना घडली आहे.

Shruti Patil
  • May 5 2024 7:25PM

अंबाजोगाई: शहरात मागच्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे चित्र आहे. असे असताना आता तर चोरटयांनी थेट एटीएम मशीनच पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शनिवारी मध्यरात्री चोरट्यांने हे एटीएम मशीन लंपास केल्यानंतर रविवारी सकाळी ही घटना समोर आली आहे.

महत्वाचे म्हणजे शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिनांक 10 मे रोजी सभा होणार असून या सभेच्या ठिकाणापासून अर्ध्या किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर ही घटना घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या निमित्ताने शहरात कालपासून मोठा पोलीस बंदोबस्त आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असताना चोरट्यानी एटीएम मशीन लांबवल्यामुळे नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
 
बीडच्या अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण चौक परिसरात 'इंडिया 1' कंपनीचे खाजगी 'एटीएम' आहे. शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी या 'एटीएम' वर दरोडा घालत चक्क 'एटीएम' मशीनचं लंपास केले.
 
दरम्यान या 'एटीएम'मध्ये संबंधित बँकेची किती कॅश होती? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार