सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

विठ्ठल मंदिराचे गर्भगृह, चौखांबी, सोळखांबी आले ७०० वर्षांपूर्वीच्या मूळरूपात!

विठ्ठल मंदिरामध्ये दुरुस्तीचे काम सुरु असतांना समोर आलेले बहुतांश धोके आता पूर्णपणे दुरुस्त करण्यात आले आहेत.

Shruti Patil
  • May 20 2024 8:26AM

पंढरपूर: विठ्ठल मंदिरामध्ये दुरुस्तीचे काम सुरु असतांना समोर आलेले बहुतांश धोके आता पूर्णपणे दुरुस्त करण्यात आले आहेत. दरम्यान, देवाचे गर्भगृह, चौखांबी आणि सोळखांबी आता ७०० वर्षांपूर्वीच्या मूळरूपात येऊ लागले आहे. मंदिराचे संवर्धनाचे काम करतांना देवाच्या गर्भगृहात मूर्ती उभी असणाऱ्या चौथऱ्याला चिरा पडल्याचे समोर आले होते. याशिवाय मुख्यमंत्री ज्या चौखांबीमध्ये महापूजेसाठी संकल्प सोडतात त्याच्या छतावरील ८ फूट लांबीची मोठी दगडी शिलाही चिरली होती. त्याशिवाय सोळखांबीतील अनेक खांबाचे दगड निसटू लागले, याची दुरुस्ती हाती घेत हे सर्व धोके दूर केले आहेत.

आता यामुळे मंदिराचे गर्भगृहात मूळ रूपातील गडद गाभाऱ्यात देवाचे सावळे रूप खुले दिसत आहे. याशिवाय चौखांबी आणि सोळखांबी येथेही दगडी फ्लोरिंग, दगडी खांब आणि दगडी छतावरील मूळ नक्षीकाम समोर आले आहे. सध्या त्याठिकाणच्या दगडांना पॉलिशिंगच्या कामाला आता सुरुवात होणार असून येथील सर्व दुरुस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. तसेच काही ठिकाणी मोठ्या भेगा पडल्याचेही निदर्शनास आले होते, पुरातत्व विभागाने तातडीने त्याची दुरुस्ती हाती घेत हे सर्व धोके दूर केले आहेत.

आता मंदिरातील प्रमुख लाकडी दारांना चांदी लावण्यास पुरातत्व विभागाने परवानगी दिली असून भाविकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणाऱ्या गरुड खांबही चांदी लावण्याची परवानगी समितीने मागितली आहे. या गरुड खांबाला भाविक मिठी मारून आपले साकडे सांगतात, जे देवापर्यंत पोचते अशी वारकरी संप्रदायात मान्यता आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार