सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लाखात मिळणार पगार सांगत भारतीय तरुणांना धाडले रशिया - युक्रेन युद्धात; चार आरोपींना अटक

१८० भारतीयांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सीबीआयने दिली आहे.

Shruti Patil
  • May 9 2024 9:35AM

वृत्तसंस्था: सीबीआयने रशिया - युक्रेन युद्धात भारतीयांना फसवणूक करून पाठवल्या प्रकरणी ४ जणांना अटक केली आहे. यातील तीन जण भारतातील आहेत, तर एकजण रशियाच्या संरक्षण मंत्रालयात काम करणारा अनुवादक आहे. त्याला २४ एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. मात्र, आता ही माहिती समोर आली आहे, की अटक करण्यात आलेल्यांमध्ये अरुण आणि येसुदास हे तिरुवनंतपुरमचे रहिवासी आहेत. अँथनी एलांगोवन हे मुंबईचे आहेत, तर निझिल जोबी बेन्सम हे रशियन संरक्षण मंत्रालयाचे आहेत.

सर्व लोक एका नेटवर्कचा भाग आहेत ज्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीयांना नोकरी आणि चांगल्या पगाराचे आमिष दाखवून फसवले जाते. त्यासाठी स्थानिक दलालांचीही मदत घेतली जाते. दुबईपासून रशियापर्यंत नेटवर्क विस्तारले आहे.

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, रशियन अनुवादक या नेटवर्कचा एक महत्त्वाचा भाग होता. तो रशियन सैन्यात भारतीयांची भरती करत असे. तर अँथनीने दुबईतील फैजल बाबा आणि रशियातील त्याच्या इतर सहकाऱ्यांसोबत भारतीयांना व्हिसा आणि विमानाची तिकिटे मिळवून देण्याचे काम केले. अरुण आणि येसुदास हे स्थानिक एजंट होते. रशियातील नोकऱ्या आणि पगार याबाबत ते लोकांना फसवत असत. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, त्यांनी काही खाजगी व्हिसा सल्लागार कंपन्या आणि एजंट्सविरुद्ध मानवी तस्करीसाठी गुन्हा दाखल केला आहे. त्याचे जाळे अनेक देशांमध्ये पसरलेले आहे. दिल्लीस्थित व्हिसा कंपनीने आतापर्यंत सुमारे १८० भारतीयांना रशियाला पाठवले आहे. त्यांना परत आणण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते, की भारतीयांनी युद्धापासून दूर राहावे...

यावर परराष्ट्र मंत्रालयाने म्हणले आहे, की हे प्रकरण रशियन सरकारकडे मांडले. अनेक भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. रशियन लष्कराने त्यांची सुटका केली आहे. याशिवाय देशातील नागरिकांना युद्धापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यान, रशिया - युक्रेनमध्ये लढण्यासाठी गेलेल्या सुरत येथील हमील अश्विनभाई मांगुकिया यांचा युक्रेनमध्ये मृत्यू झाला होता.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार