नवी दिल्ली: दिल्लीमध्ये लव्ह जिहादचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. दिल्लीतील जहांगीरपुरी येथे जिहादी तरुणांनी सरिता शर्मा (वय ३६ वर्षे) नावाच्या हिंदू महिलेची घरात घुसून त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. आरोपींपैकी एक मुसलमान तरुण सरिता शर्मा यांच्या अल्पवयीन मुलीची छेड काढत असत. त्यामुळं सरिता शर्मा यांनी आरोपी जिहादी तरुणाच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
‘माझ्याविरुद्धची तक्रार मागे घे, अन्यथा जिवे मारीन’, अशी धमकी जिहादी आरोपी तरुणाने सरिता शर्मा यांना दिली होती. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ एप्रिल २०२४ या दिवशी आरोपी तरुण आणि त्याचे साथीदार सरिता शर्मा यांच्या देहलीतील जहांगीरपुरी भागातील घरात घुसले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडून तेथून पळ काढला. कुटुंबियांनी घायाळ महिलेला बाबू जगजीवन राम रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
आरोपी जिहादी तरुणांना पकडण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथके नेमण्यात आली आहेत. या प्रकरणी मृत सरिता शर्मा यांच्या कुटुंबियांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. सरिता शर्मा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी वेळीच आरोपीवर कारवाई केली असती, तर आज ही घटना घडली नसती, असे कुटुंबियांनी सांगितले.