सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

'भारत तेरे टुकड़े होंगे' असं म्हणणाऱ्या काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमारला मारहाण; फुलांची माळ घालून लगावली कानशिलात

“ज्या कन्हैया कुमारने भारताचे हजार तुकडे आणि अफजल आम्हांला लाज वाटते, तुझे मारेकरी जीवंत आहेत, अशा घोषणा दिल्या, त्याला आम्ही दोघांनी कानशिलात लावून उत्तर दिले आहे.” अस हल्ला करणाऱ्यांनी म्हणले आहे.

Shruti Patil
  • May 18 2024 10:00AM

Kanhaiya Kumar Attacked: ईशान्य दिल्लीत काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान ही मारहाणीची घटना घडली आहे. ईशान्य दिल्लीत कार्यकर्त्याकडून मारहाण करण्यात आली आहे. कन्हैया कुमार यांना पुष्पहार घालण्याच्या बहाण्याने आलेल्या दक्ष चौधरी याने कन्हैया कुमार यांच्या कानाखाली मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना ईशान्य दिल्लीतील उस्मानपूर पोलीस स्टेशन परिसरातील करतार नगरमध्ये घडली आहे.

कन्हैया कुमारवर हल्ला करण्याच्या अगोदर आणि त्यानंतर हल्ला करणाऱ्यांनी व्हिडिओ तयार केला आहे. हल्ला करण्यापूर्वी ‘कन्हैया आता फटके खाणार’ असा व्हिडिओ हल्ला करणाऱ्यांनी तयार केला होता. तर कानशिलात लगावल्यानंतर दोघांनी पु्न्हा व्हिडिओ तयार केला. “ज्या कन्हैया कुमारने भारताचे हजार तुकडे आणि अफजल आम्हांला लाज वाटते, तुझे मारेकरी जीवंत आहेत, अशा घोषणा दिल्या, त्याला आम्ही दोघांनी कानशिलात लावून उत्तर दिले आहे.” अस हल्ला करणाऱ्यांनी म्हणले आहे.

 

यानंतर हल्ला करणाऱ्यांनी कन्हैया कुमारवर केलेल्या हल्ल्याचे समर्थन केले आहे. जोपर्यंत आमच्यासारखे तरुण आहेत, सनातनी जिवंत आहेत, तोपर्यंत भारताचे कोणीच तुकडे करु शकत नाही, असा दावा व्हिडिओत त्या दोन तरुणांनी केला आहे. त्यांनी भारत माता की जय, भारतीय लष्कराचा विजय असो, गोमाता की जय, जय श्रीराम असा जयघोष केला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार