बीड (दि.२६): भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना राष्ट्रीय बंजारा परिषदेने जाहीर पाठिंबा दिला आहे. जिल्ह्यातून पंकजाताईंना प्रचंड मताधिक्य देण्यासाठी परिषदेच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागण्याचा निर्धार केला आहे.
बंजारा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव अॅड.पंडित राठोड व प्रदेशाध्यक्ष जयकुमार राठोड यांनी गुरूवारी परळी येथे पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले. बीड लोकसभा मतदार संघात महायुतीची ताकद वाढली असून पंकजाताईंना मोठे मताधिक्य मिळेल यात शंका नाही. जिल्हयातील सर्व बंजारा समाज मताधिक्य देण्यासाठी एकजुटीने कामाला लागले आहेत असे परिषदेने यावेळी म्हटले.
याप्रसंगी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जयकुमार राठोड यांच्यासह जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, बाळराजे राठोड, अनिल महाराज सेवाधाम, सुंदरसिंग महाराज, सायस पवार आदींसह असंख्य बंजारा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
गोरबंजारा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करणार - पंकजाताईंनी दिली ग्वाही...
गोरबंजारा समाजाच्या पाठिंब्यासाठी गोरबंजारा समाजाकडून गोरबोलीला आठव्या सूचित आणण्यासाठी केंद्रीय स्तरावर पुढाकार घ्यावा. बंजारा समाजाला गोरबोली भाषेचा दर्जा मिळून द्यावा. गोरबंजारा समाजाचे नेते, कार्यकर्ते यांना राजसत्तेमध्ये सहभागी करून संधी द्यावी या प्रमुख मागण्या आपण पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करू असे पंकजाताईंनी यावेळी म्हटले.