सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांना मिळणार मंदिर व्यवस्थापनाचे धडे

मुंबई विद्यापीठातील हिंदू अध्यासन केंद्राच्या पुढाकारातून मंदिर व्यवस्थापन विषयात ६ महिन्यांचे प्रमाणपत्र आणि १२ महिन्यांचे पदविका अभ्यासक्रम राबविले जाणार आहेत.

Shruti Patil
  • May 16 2024 9:15AM

Temple Management Syllabus: मुंबई विद्यापीठात या शैक्षणिक वर्षापासून मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम सुरु केला जात आहे. मुंबई विद्यापीठातील हिंदू अध्यासन केंद्राच्या पुढाकारातून मंदिर व्यवस्थापन विषयात ६ महिन्यांचे प्रमाणपत्र आणि १२ महिन्यांचे पदविका अभ्यासक्रम राबविले जाणार आहेत. जून २०२४ पासून या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे. नुकतेच मुंबई विद्यापीठाचे हिंदू अध्यासन केंद्र आणि टेम्पल कनेक्ट या संस्थेत सामंजस्य करार करण्यात आला. सर्वसामान्यांमध्ये मंदिराचे व्यवस्थापन, प्रशासन आणि संघटन याविषयी जागृती व्हावी अशा व्यापक दृष्टिकोनातून या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे.

मंदिर व्यवस्थापन या अभ्यासक्रमात भारतीय ज्ञान परंपरा, व्यवस्थापन शास्त्राची महत्वाची सूत्रे व तत्वे, स्थापत्य, गर्दीचे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, महसूल व वित्त व्यवहार, माहिती व तंत्रज्ञानाचा वापर आणि पर्यावरण आणि परिसरपूरक अशा अनुषंगिक विषंयावर या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून प्रकाश टाकला जाणार आहे. मुंबई विद्यापीठाचे हिंदू अध्यासन केंद्र आणि टेम्पल कनेक्ट या संस्थेत सामंजस्य करार करण्यात आला. सर्वसामान्यांमध्ये मंदिराचे व्यवस्थापन, प्रशासन आणि संघटन याविषयी जागृती व्हावी अशा व्यापक दृष्टिकोनातून या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे

विशेष म्हणजे या प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रमात 3 महिन्यांचे कार्यांतर्गत प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. ज्यामध्ये मुंबईसह महाराष्ट्र आणि देशातील विविध मंदिरांमध्ये प्रत्यक्ष अनुभवाधारित प्रशिक्षण उपलब्ध होऊ शकेल.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार