सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

‘कॅफे’ संस्कृती त्वरित न थांबवल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू - अरुण लाड

राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांची चेतावणी...

Shruti Patil
  • May 20 2024 8:04AM

सांगली: सांगली जिल्ह्यात ‘कॅफे’च्या नावाखाली अश्लील चाळे होत आहेत. शहरातील एका कॅफेत गुंगीचे औषध देऊन मुलीवर अत्याचार करून व्हिडिओ काढले जातात. हा प्रकार गंभीर आहे. सुसंस्कृत सांगली येथे पोलीस आणि प्रशासन यांच्या पाठबळानेच असले धंदे चालू आहेत. अवैध धंद्यांवर पोलिसांचा वचक नाही. पोलीस हप्ते घेत असल्यानेच कारवाई होत नाही. शहरासह गल्लीबोळात चालू झालेली ‘कॅफे’ संस्कृती त्वरित थांबवावी. संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, अशी चेतावणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण लाड यांनी दिली आहे.

आमदार अरुण लाड म्हणाले, की ‘‘सांगलीत ‘कॅफे’च्या नावाखाली भयानक प्रकार चालू आहे. अल्पवयीन मुलींना आमीष दाखवून त्यांना ‘कॅफे’त नेऊन गैरप्रकार केले जातात. पोलिसांनी पैसे खाल्ले, तर कारवाई कशी होणार ? ते (गुन्हेगार) मोकाटच सुटणार. माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. कॅफे चालकांवर धाक ठेवण्याचे काम प्रशासन करत नाही म्हणून श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. पोलीस अवैध धंद्यांवर कारवाई करत नसतील, तर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष श्री. नितीन चौगुले यांनी कारवाई केली, तर त्यात गैर काय? ‘पोलीस आम्हाला नको’, अशी म्हणायची वेळ आता येईल.’’

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार