सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नारायण राणे यांच्यासाठी राज ठाकरे यांची ४ मे रोजी कणकवलीमध्ये पहिली सभा

आपण फक्त मोदींमुळे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी यांना पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले होते.

Shruti Patil
  • Apr 30 2024 9:03AM

कणकवली: महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार आहेत. राज ठाकरे हे महायुतीचे रत्नागिरी - सिंधुदुर्गातील उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी ४ मे रोजी कणकवली येथे जाहीर सभा घेणार आहे. कणकवलीमध्ये उप रुग्णालयासमोरील मैदानात राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे.

राज ठाकरे यांच्या सभेमुळे नारायण राणे यांची शक्ती वाढणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नारायण राणे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने विनायक राऊत यांना उमेदवारी दिली आहे. एकीकडे राज ठाकरे नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सहभाग घेणार आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे विनायक राऊत यांच्यासाठी सभा घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ही निवडणूक कोकणातील असली, तरी ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी होण्याची शक्यता आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार