पालघर: महाराष्ट्रातील महायुतीचं जागावाटप पूर्ण झालं नव्हतं. महायुतीचे कल्याण, ठाणे, नाशिक, पालघरच्या जागेवरील उमेदवार निश्चित झाले नव्हते. परंतु २ मे रोजी महायुतीने पालघरच्या जागेचा तिढा सोडवला आहे.
ठाणे, कल्याण आणि नाशिक या तीन जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाल्या असून शिंदे गटाने या तिन्ही जागांवरील त्यांचे उमेदवारी जाहीर केले आहेत. तर, आज भाजपाने काल पालघरचा उमेदवार जाहीर केला
महायुतीत पालघरची जागा भाजपाने आपल्याकडे घेतली असून त्यांनी येथून हेमंत विष्णू सावरा यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. भाजपाच्या केंद्रीय कार्यालयाने ही उमेदवारी जाहीर केली आहे.