सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गुन्हे शाखेने घाटकोपर होर्डिंग कोसळल्या प्रकरणी भावेश भिंडेला उदयपूरमध्ये ठोकल्या बेड्या

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं भावेश भिंडे याला उदयपूर येथील रिसॉर्टमधून बेड्या ठोकल्या आहेत.

Shruti Patil
  • May 17 2024 9:18AM
मुंबई: घाटकोपर येथे होर्डिंग कोसळल्या प्रकरणी होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिंडे याच्यावर सोमवारी रात्री पंतनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिली होती. यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं भावेश भिंडे याला उदयपूर येथील रिसॉर्टमधून बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी भावेश भिंडे हा घटना घडल्याच्या रात्री मुलुंड येथील घरातून पळाला. लोणावळा इथं भिंडे पळून आला होता. त्यानंतर चार दिवसांनी गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने त्याला अटक केली आहे. भावेश भिंडेविरुद्ध जानेवारी २०२४ मध्ये मुलुंड पोलीस ठाण्यात बलात्काराचा एक गुन्हा दाखल होता. या प्रकरणात पोलिसांनी भावेश भिंडे विरोधात आरोपपत्रही दाखल केलं आहे.
 
भावेश भिंडेच्या विरोधात बृहन्मुंबई महानगर पालिकेनं अनेक एफआयआर नोंदवले आहेत. तसेच भावेश भिंडे याने २००८ मध्ये मुलुंडमधून अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणुकही लढवली होती. यावेळी भावेश भिंडेनं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यानं सांगितलं होतं की, २००९ मध्ये त्याच्यावर रेल्वे पोलिसांकडे २३ गुन्हे दाखल होते. ही सर्व प्रकरणं चेक बाऊन्ससाठी मुंबई महानगरपालिका कायदा आणि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत आहेत. मागील दशकात होर्डिंग्ज आणि बॅनर्ससाठी रेल्वे आणि बीएमसीचे अनेक कॉन्ट्रॅक्ट्स भिंडे यानं मिळवले होते. यात त्याने महानगरपालिका आणि रेल्वेच्या अनेक नियमांचे उल्लंघन केलेले होते. त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर वृक्षतोडीचे देखील गुन्हे दाखल आहेत.

 

१३ मे रोजी घाटकोपर परिसरात होर्डिंग कोसळल्यानं १६ लोकांचा नाहक बळी गेला. त्यामुळं इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक भावेश भिंडे याच्यासह अन्य तिघांवर कलम ३०४ अन्वये पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी भिंडे गुजू ॲड्स नावाची कंपनी चालवत होता. त्याच्यावर आणि या कंपनीवर अनेक गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याला महापालिकेनं काळ्या यादीत टाकलं होतं. तरीही त्याने इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड ही नवीन कंपनी सुरु केली आणि त्याला होर्डिंगचे कंत्राट मिळू लागले होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार