सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आम्हांलाही मोदींसारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी उद्योगपतींनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक

पाकिस्तानी अमेरिकन उद्योगपती साजिद तरार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे.

Shruti Patil
  • May 16 2024 8:18AM

वृत्तसंस्था: पाकिस्तानी अमेरिकन उद्योगपती साजिद तरार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, पीएम मोदी हे केवळ भारतासाठीच नाही तर जगासाठी चांगले नेते आहेत आणि पाकिस्तानलाही त्यांच्यासारखा नेता मिळेल अशी आशा आहे. ते पुढे म्हणाले की, मला आशा आहे की पंतप्रधान मोदी पाकिस्तानशी चर्चा आणि व्यापार सुरू करतील.

बाल्टिमोरस्थित पाकिस्तानी अमेरिकन व्यापारी साजिद तरार म्हणाले की मोदी हे केवळ भारतासाठीच नव्हे तर जगासाठी चांगले नेते आहेत आणि पाकिस्तानलाही त्यांच्यासारखा नेता मिळावा, अशी आशा व्यक्त केली.

पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलतांना ते म्हणाले, “मोदी हे एक अद्भुत नेते आहेत. ते जन्मजात नेते आहेत. प्रतिकूल परिस्थितीत पाकिस्तानला भेट देणारे ते पंतप्रधान आहेत. मला आशा आहे की पंतप्रधान मोदी पाकिस्तानशी चर्चा आणि व्यापार सुरू करतील. तरार म्हणाले की, पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत यात शंका नाही. तरार पुढे म्हणाले की, भारतातील 97 कोटी लोक त्यांच्या मताधिकाराचा वापर करत आहेत, हा चमत्कारापेक्षा कमी नाही. भारत ही सर्वात मोठी लोकशाही आहे. मी तिथे पीएम मोदींची लोकप्रियता पाहत आहे. भारतीय लोकशाहीतून विश्व शिकेल हे तुम्हाला भविष्यात दिसेल.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार