सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

व्हॉट्सॲपवर पुण्यातील एका आईचा 'J1' पोल व्हायरल; नेटिझन्सकडून 'आंटी सुपरकूल आहे' म्हणत होतंय कौतुक

व्हाट्स ॲप पोलचा असाही एक सदुपयोग...

Shruti Patil
  • May 6 2024 11:24AM

पुणे: व्हॉट्सॲपने आपले मत व्यक्त करण्यासाठी पोल नावाचे एक फीचर आणले होते, जे व्हाट्सअप वापरकर्त्यांना मतदान निर्मात्याने प्रदान केलेल्या पर्यायांवर टॅप करून त्यांची मते मिळवून देते. अलीकडेच, पुण्यातील एका आईने आपल्या मुलाला जेवण घरी करणार की बाहेर? असे विचारतांना व्हाट्सअप पोलचा योग्य वापर केला. मुलाने आईने बनवलेल्या या पोलचा स्क्रीनशॉट X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केला आहे.

या आई व मुलाच्या व्हाट्सअप वरील छोट्या संवादाने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. याकडे लक्ष वेधून घेण्याचे मुख्य कारण म्हणजे आईने पोलमध्ये जेवण शब्द न वापरता त्याचा संक्षेप म्हणजे 'J1' असा वापरल्याने ते नेटकऱ्यांना खूप सुपरकूल वाटले.

एका एक्स वापरकर्त्याने "J1 हा सर्वोत्तम शॉर्टकट आहे! तुम्हांला तिचा अभिमान असायला हवा," अशी टिप्पणी केली आहे, तर दुसऱ्याने "मी पोलपेक्षा J1 ने अधिक प्रभावित झालो आहे," अशी टिप्पणी केली आहे. "हे माझ्या आईला शिकवायचे आहे", "मी सर्व प्रकारची निंदनीय संक्षेप पाहिली आहेत परंतु जेवणाची J1 अशी कल्पनाही केली नाही," अशा प्रकारच्या अनेक कमेंट्स नेटीझन्सनी त्यावर केल्या आहेत. एकंदरीत त्या मुलाच्या आईचे सुपरकूल आंटी म्हणून नेटीझन्सनी कौतुक केले आहे. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसवर हे मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे आणि त्याचे सर्व कौतुक करत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार