सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे

Donation

मतदानाला सुरुवात होताच पंतप्रधान मोदींची मराठीतून पोस्ट; मतदारांना केलं आवाहन

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत पोस्ट केली आहे.

Shruti Patil
  • May 13 2024 8:01AM

Maharashtra Loksabha Election 2024: लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत पोस्ट केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी देशातील १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ९६ लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ११ मतदारसंघाचा समावेश आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान करण्यासाठी नागरिकांना मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. दरम्यान, मतदानाला सुरुवात होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत पोस्ट केली आहे.

मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळामध्येच पंतप्रधान मोदींनी आपल्या अधिकृत X (पूर्वीचे ट्वीटर) अकाउंटवरून मराठीत एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मतदारांना विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.

"लोकसभा निवडणुकीच्या आजच्या चौथ्या टप्प्यात, 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांसाठी मतदान होत आहे. या मतदारसंघातील लोक मोठ्या संख्येने मतदान करतील आणि युवा मतदार तसेच महिला मतदार यात प्रामुख्याने अग्रेसर असतील अशी मला खात्री आहे", असं पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार