सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनोद तावडे यांची आत्मीयतेने केली विचारपूस; "पार्टी विथ डिफरन्स" म्हणत नेटकरी करत आहेत व्हायरल फोटोचे कौतुक

भाजपाने विनोद तावडे यांना डावलले म्हणणाऱ्या सर्व प्रश्नांना या फोटोने पूर्णविराम मिळाला आहे.

Shruti Patil
  • May 18 2024 12:14PM

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुतीची काल १७ मे रोजी मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सभा पार पडली. महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच अशी महत्त्वाची आणि मोठी सभा पार पडली. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि इतर अनेक दिग्गज नेते हजर होते. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनोद तावडे यांची आत्मियतेने विचारपूस केल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे फक्त भाजपातच घडू शकतं, असं म्हणत सोशल मीडियावर या फोटोचे कौतुक होत आहे.

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी २ मार्च २०२४ रोजी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. ही यादी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी जाहीर केली. खरं तर पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकही नाव नव्हतं, तरीही या पत्रकार परिषदेची महाराष्ट्रात बरीच चर्चा झाली. त्याचं कारण म्हणजे यादी जाहीर करणारे नेते महाराष्ट्रातील होते. या पत्रकार परिषदेनंतर भाजपच्या पहिल्या यादीतील उमेदवारांची जशी चर्चा रंगली, तशी विनोद तावडेंचीही चर्चा झाली.

विनोद तावडे हे २०१४ ते २०१९ या शिवसेना - भाजपा युती सरकारच्या काळात महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री होते. महाराष्ट्र भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांच्या मांदियाळीत त्यांचा वरचा क्रमांक होता. मात्र २०१९ मध्ये त्यांना विधानसभेचं तिकीट मिळालं नाही. त्यावेळी तावडे यांच्यासह राजकीय वर्तुळात सर्वांनाच धक्का बसला होता. विनोद तावडे यांची राजकीय कारकीर्द संपली, पक्षाने त्यांचे पंख छाटले अशा चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. परंतु या सर्व घडामोडींना पाच वर्षं पूर्ण होण्यापूर्वीच विनोद तावडे यांनी पक्षात पुन्हा आपला जम बसवला. मोदीजींचे हे अनोखे रूप लोकांना खूप भावले. मंचावर गेल्यानंतर मोदीजींनी तावडे यांना म्हणाले, की 'अरे तावडेजी, इधर कैसे? दिल्ली काबीज करनी है, बिहार का क्या हाल है?'. या फोटोमुळे सर्व प्रश्नांना पूर्णविराम मिळाला आहे. 

'ज्यांना संयम आणि निष्ठेचे वावडे, त्यांना उत्तर विनोद तावडे', 'ज्या विनोद तावडेंचे विधानसभेचे तिकीट नाकारले गेले म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द संपली अशी चर्चा करणाऱ्यांनी तावडेंची आपुलकीने विचारपूस करतांनाचा मोदींचा हा फोटो पाहावा', 'एका कार्यकर्त्याला, नेत्याला एवढा मान फक्त भाजपातच मिळू शकतो', 'म्हणून भाजपा पार्टी विथ डिफरन्स यासाठी प्रसिद्ध आहे', या फोटोवर अशा अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार