कोल्हापूर: कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघ प्रवासांतर्गत बाळूमामाच्या नावाने चांगभलं म्हणत, लाखो लोकांचे श्रद्धास्थान असणारे संत बाळूमामा देवस्थान व राज्यभरातील बाळूमामा भक्त यांनी काळी घोंगडी, काठी व भंडारा देत मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद दिले. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात सरकारने घेतलेल्या सकल अध्यात्मिक क्षेत्रातील कार्याचा विस्तार व योजना उपस्थितांपुढे आधोरेखित केल्या.
यासोबतच कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील वैष्णव, शैव, लिंगायत, वारकरी, शाक्त जोतिबा भक्त परिवार, स्वामी समर्थ केंद्र, श्री जंगली महाराज संप्रदाय अशा नानाविध संप्रदाय व पंथातील ज्येष्ठांशी यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी संवाद साधला. याप्रसंगी आध्यात्मिक आणि सामाजिक चळवळीतील काही व्यक्ती आणि संत मंडळी उपस्थित होते.