सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कार अपघातातील अल्पवयीन आरोपीस सज्ञान आरोपी म्हणून कारवाई करा - पोलीस आयुक्त अमितेश कुमार

या घटने संदर्भात सत्र न्यायालयात आम्ही दाद मागत असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Shruti Patil
  • May 21 2024 8:33AM
Pune Hit And Run Case: कोरेगाव पार्कमधील अल्पवयीन मुलाने बारमध्ये जाऊन दारू पिऊन आलिशान कार भरधाव वेगात चालवून दोन जणांचा अपघाती मृत्यू करणे हे प्रकरण गंभीर आहे. पोलिसांनी गांभीर्याने याबाबत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात ३०४ अंतर्गत गंभीर कलम लावले गेले आहेत. हा आरोपी अल्पवयीन आहे. त्यामुळे त्याला १४ दिवस निरीक्षण गृहात ठेवण्यासाठी मागणी न्यायालयात केली होती. हा गुन्हा गंभीर असून आरोपीला सज्ञान म्हणून कारवाई करण्यास परवानगी मिळावी. मात्र, आमची मागणी आरोपी मुलास निरीक्षण गृहात टाकण्यासाठी केलेली मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. मद्यप्राशन करून आरोपी गाडी चालवत होता, हे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट झाले असून त्याबाबत आम्ही न्यायालयात माहिती दिली. याबाबत सत्र न्यायालयात आम्ही दाद मागत असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
अमितेश कुमार म्हणाले, मुलाच्या पालकांनी महागडी गाडी त्याला कशी दिली, मुलाला दारू पिण्यास परवानगी दिल्याने त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. वडील व मॅनेजर यांच्याविरोधात पोलीसांकडून वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार