सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आयएससीई च्या दहावी - बारावी निकालात मुलींची बाजी; यंदा टॉपर्सची यादी जाहीर करण्यास बोर्डचा नकार

काऊंन्सिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी - बारावीच्या परीक्षेचे निकाल सोमवारी जाहीर करण्यात आले आहे.

Shruti Patil
  • May 7 2024 8:10AM

मुंबई: काऊंन्सिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी - बारावीच्या परीक्षेचे निकाल सोमवारी जाहीर करण्यात आले असून, या निकालात मुलींची कामगिरी चांगली असल्याची माहिती बोर्डाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील बोर्डाने परीक्षेत टॉप करणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली नसल्यामुळे जीवघेणी स्पर्धा यावेळी थांबली. मंडळाचा दहावीचा निकाल ९९.४७ टक्के इतका लागला आहे, तर बारावी परीक्षेचा निकाल ९८.१९ टक्के लागला आहे.

दहावीच्या (आयसीएसई) परीक्षेला देशभरातून बसलेल्या २,४३,६१७ विद्यार्थ्यांपैकी २,४२,३२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेला १,१३,१११ मुली बसल्या होत्या. त्यापैकी १,१२,७१६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. हे प्रमाण ९९.६५ टक्के आहे, तर १,३०,५०६ मुलांपैकी १,२९,६१२ मुलगे उत्तीर्ण झाले आहेत. हे प्रमाण ९९.३१ टक्के इतके आहे. मुलींची कामगिरी मुलांच्या तुलनेत चांगली राहिली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार