सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पुणे पोलिसांची सर्वात मोठी कारवाई; ९० जण ताब्यात

महादेव ॲपद्वारे सट्टा ऑनलाईन चालविणाऱ्या कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला आहे.

Shruti Patil
  • May 16 2024 8:31AM

पुणे: महादेव बेटिंग ॲप प्रकरणाचे पुणे कनेक्शन उघड झाले आहे. याप्रकरणी काल नारायणगाव येथील एका बड्या व्यापाऱ्यासह त्याच्या कुटुंबातील चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा महादेव ॲपद्वारे ऑनलाइन सट्टा चालविणाऱ्या कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महादेव ॲपद्वारे ऑनलाइन सट्टा चालविणाऱ्या कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी नारायणगावमध्ये ही धडक कारवाई केली असून चौकशीसाठी ९० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोन महिन्यांपूर्वी नारायणगाव आणि जुन्नर येथील दोन प्रतिष्ठित व्यावसायिकांनी आयटी कंपनी सुरू करण्यासाठी भाडेतत्त्वावर घेतले होते. मात्र, या ठिकाणी महादेव बुक आणि लोटस ३६५ या ॲपद्वारे ‘आयपीएल’ आणि इतर खेळांवर ऑनलाइन सट्टा खेळण्यात येत असल्याची पोलिसांना मिळाली होती.

या माहितेच्या आधारे गुन्हे शाखा आणि खेड येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत मोबाईल, लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. महादेव बेटिंग ॲप प्रकरणात यापूर्वी ईडी आणि पोलिसांनी छत्तीसगड राज्य, नोएडासह अन्य काही शहरांत महादेव बेटिंग ॲपच्या कॉल सेंटरवर कारवाई केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार