सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ठाकरेंच्या जाहिरातीमध्ये पॉर्न स्टारने केला अभिनय; चित्रा वाघ यांचा आरोप

ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्न स्टारने अभिनय केल्याचा आरोप भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.

Shruti Patil
  • May 3 2024 9:54AM

मुंबई: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्न स्टारने अभिनय केल्याचा आरोप भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात कुठली संस्कृती आणण्याचा प्रयत्न करत आहात? असा सवाल चित्र वाघ यांनी उद्धव ठाकरे यांना उपस्थित केला आहे.

भाजपा प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना चित्रा वाघ म्हणाल्या, की आदुबाळ नाईट लाईफ लिमिटेड प्रोडक्शनच्या जाहिरातीमधील पात्र पॉर्नस्टार आहे. पब, पार्टी आणि पॉर्नची संस्कृती आणण्याचा किळसवाणा प्रकार उद्धव ठाकरे करत आहेत. हा पॉर्नस्टार जाहिरातीमध्ये विचारतो की, महिलांवरील अत्याचार कधी थांबणार? हाच पॉर्नस्टार लहान वयांच्या मुलींबरोबर अश्लील चित्रण करतो. या पॉर्न स्टारचे एका ॲपवरती मुलींबरोबर घाणेरडे कृत्य करतांनाचे व्हीडिओ आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात कुठली संस्कृती आणण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहे? ही जाहिरात तयार करणारी कंपनी कोणाची? त्याच्या कंपनीचा आणि पॉर्नस्टारचा काय संबंध आहे? असा प्रश्न चित्र वाघ यांनी विचारला आहे.

हा पॉर्नस्टार एकीकडे मुलींबरोबर अश्लील चाळे करतांना दिसतो. दुसरीकडे हा पॉर्नस्टार म्हणतो, की महिलांवरील अत्याचार कधी थांबणार? आदुबाळ नाईट लाईफ लिमिटेड प्रोडक्शनच्या जाहिरातींवर उद्धव ठाकरेंनी भूमिका मांडावी, असे आव्हान चित्रा वाघ यांनी केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार