सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मतदानासाठी सूक्ष्म नियोजन

बीड लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.

Shruti Patil
  • May 4 2024 5:09PM
बीड: मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. यासाठी सूक्ष्म नियोजनही होत आहे. बीड लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. यासह 85 वर्षापेक्षा अधिक वृद्ध, दिव्यांग, निवडणूक कामासाठी इतर जिल्ह्यात कार्यरत, इतर जिल्ह्यातील चौथा टप्प्यातील मतदार बीड जिल्ह्यात कार्यरत, 13 मे रोजी विविध विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राच्या ठिकाणी कर्तव्य पालन करत असणारे मतदार, निवडणुकीच्या काळात विविध कामांवर कार्यरत मतदारांनी मतदान करावे यासाठी आयोगाने वेगवेगळ्या उपाययोजना योजिल्या आहेत.
 
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी वेगवेगळे उपाययोजना केले जात आहेत. त्यातच गृह मतदान हा एक विशेष उपक्रम निवडणूक आयोगाद्वारे राबविला जात आहे. बीड लोकसभा मतदारसंघात 39 हजार 205 इतके मतदार 85 वर्षाच्या अधिकच्या वयोगटातील आहेत. यापैकी 340 आणि एकूण दिव्यांग 8562 पैकी 53 दिव्यांग मतदारांनी गृह मतदानासाठी अर्ज दाखल केला होता. असे एकूण 393 मतदार गृह मतदानाचा लाभ घेणार होते. आता 391 वृद्ध आणि दिव्यांग गृह मतदानाचा लाभ घेणार आहेत.
 
 मतदानाच्या कामी कार्यरत असणारे बीडचे निवासी जे इतर ठिकाणी कार्यरत आहेत, तिथे मतदान ते करू शकतात. यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या मार्गदर्शनात इतर दहा जिल्ह्यात बीड मधील निवडणुकीच्या कामावर असणाऱ्या मतदारांना मतपत्रिका त्यांच्या विधानसभा निहाय ठिकाणी पाठविण्यात आलेल्या आहेत. त्या जिल्ह्यातील सुविधा केंद्रात ते निश्चित दिवशी मतदान करून पुन्हा उलट टपाली त्या मतपत्रिका बीड जिल्ह्यात येतील. असे एकूण 1034 मतदार मतदान करणार आहेत.
 
बीड लोकसभा मतदारसंघात इतर जिल्ह्यातील कार्यरत कर्मचारी ज्यांचे मतदान चौथा टप्प्यातच आहे त्यांच्या मतपत्रिका त्या त्या जिल्ह्यातून येणार असून येथे सुविधा केंद्रात ते मतदान करतील असे एकूण 365 मतदार बीड जिल्ह्यात निवडणुकीच्या कामावर आहेत. मतदान झाल्यावर त्या मतपत्रिका संबंधित जिल्ह्यात पाठवण्यात येणार आहेत.
 
बीड जिल्ह्यातीलच रहिवासी जे मतदान पथकाच्या विविध कामात गुंतलेले आहेत. जसे पोलीस, होमगार्ड , व्हिडिओ ग्राफर , वाहन चालक असे एकूण 1800 मतदार त्यांच्या मतदानाचा हक्क यावेळी बीड लोकसभा मतदारसंघातील दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाच्या ठिकाणी सुविधा केंद्र उभारले असून येथे ते मतदानाचा हक्क बजावू शकतील. असे प्रशिक्षण 4, 5 मे तथा 11 मे ला होणार आहे. 
 
10, 11 व 12 मे रोजी जिल्हास्तरीय पोस्टल बॅलेट द्वारा 600 मतदार मतदान करणार आहेत. यासह मतदान केंद्रावर 13 मे रोजी कार्यरत असणारे केंद्राध्यक्ष, मतदार अधिकारी व अन्य कर्मचारी जे निवडणुकीच्या कामावर 13 मे रोजी आहेत. ते ज्या मतदान केंद्रावर कार्यरत असणार आहेत तिथेच करतील. असे एकूण 8215 कर्मचारी हे त्यांच्या मतांचा हक्क 13 मे रोजी बजावतील.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार