सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

विखे पाटलांना पाठिंबा देणं भोवलं; ठाकरे गटाच्या माजी आमदारांचं पक्षातून निलंबन

सुजय विखे पाटलांना पाठिंबा दिल्याने ठाकरे गटाकडून कारवाई...

Shruti Patil
  • May 3 2024 9:37AM

अहिल्यानगर: अहिल्यानगर दक्षिणमध्ये प्रामुख्याने महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यामध्ये ही लढत होत असून ही लढत सध्या महाराष्ट्रमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. निवडणूक जशा जवळ येत आहे तशा वेगवेगळ्या संघटना आणि नेते उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी पुढे येत आहे. त्यातच काल महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांना पारनेर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार विजय औटी यांनी पाठिंबा दर्शविला.. त्यामुळे विधानसभेचे माजी उपसभापती आणि शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांचे पक्षातून निलंबन करण्यात आले आहे.

शशिकांत गाडे यांनी माजी आमदार विजय औटी यांनी पक्षाचा आदेश पाळला नसल्याने त्यांच्यावर पक्षभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. त्यानुसार आज त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. निवडणूक काळात पक्षविरोधी भूमिकेमुळे निलंबित होणारे हे पहिलेच माजी आमदार आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार