सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

'मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत भूमिका स्पष्ट करा'; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

मराठ्यांना देण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्राविरोधात दाखल जनहित याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

Shruti Patil
  • May 3 2024 9:45AM

मुंबई: मराठ्यांना देण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्राविरोधात दाखल जनहित याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. ओबीसी कल्याण संघटनेचे अध्यक्ष मंगेश ससाणे यांच्यामार्फत ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय व न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.

या याचिकेला विरोध करणारे अर्ज ही मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाले आहेत. या अर्जाची प्रत अन्य पक्षकारांना अद्याप मिळालेली नाही. ही प्रत उपलब्ध करून देण्याचे निर्देशही न्यायालयाने या अर्जदारांना दिले आहेत.

ससाणे यांच्या याचिकेवर प्रत्युत्तर सादर केले आहे का? अशी विचारणा मुख्य न्यायमूर्तींनी राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांना केली. त्यावर या याचिकेचे प्रत्युत्तर सादर झालेले नाही, असे महाधिवक्ता सराफ यांनी स्पष्ट केले. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ जूनपर्यंत तहकूब केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार