सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बजरंग सोनवणे यांना केज तालुक्यातून आणखी एक धक्का

सोनवणेंच्या ताब्यातील मुलेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच, सदस्य व कार्यकर्त्यांचा धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश...

Shruti Patil
  • May 4 2024 9:31PM
परळी वैद्यनाथ: महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार बजरंग सोनवणे यांना ऐन निवडणुकीत आणखी एक धक्का बसला असून, त्यांच्या ताब्यातील मुलेगाव ग्रामपंचायतचे सरपंच, अन्य सदस्य व अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. 
 
लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना बजरंग सोनवणे यांच्या ताब्यातील महत्त्वाचे गाव असलेल्या मुलेगाव ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आल्याने बजरंग सोनवणे यांना निश्चितच याचा फटका बसणार आहे. मुलेगावचे सरपंच तसेच कळमअंबा ग्रामपंचायत सदस्य यांसह अनेकांनी धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत व राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार