सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मोदीजींना पंतप्रधान बनवण्यासाठी सवरा यांना विजयी करा - कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी १६ मे रोजी लोकसभा निवडणूक २०२४ साठी पालघर मतदारसंघामधील महायुतीचे उमेदवार हेमंत सवरा यांच्या प्रचासारासाठी स्नेहभोजन आणि बैठक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Shruti Patil
  • May 17 2024 5:05PM

वसई: कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी १६ मे रोजी लोकसभा निवडणूक २०२४ साठी पालघर मतदारसंघामधील महायुतीचे उमेदवार हेमंत सवरा यांच्या प्रचासारासाठी स्नेहभोजन आणि बैठक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रम वसई पश्चिम येथील विश्वकर्मा हॉल येथे संपन्न झाला. यावेळी भाजपा कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. 

"देशाच्या सुरक्षेसाठी, देशाला मजबूत बनवण्यासाठी, सर्वांना शिक्षण, आरोग्याच्या सुविधा मिळाव्या, प्रत्येकाची स्वप्न साकार व्हावी याची जबाबदारी मोदीजी घेतील. आता येत्या निवडणुकीत आपली सुद्धा एक जबाबदारी आहे ती म्हणजे कमळाच्या चिन्हासमोरचे बटन दाबण्याची. आपल्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. सवरा हे अतिशय मेहनती आणि राष्ट्रीय विचारांनी परिपक्व झालेले व्यक्तिमत्व आहे. त्यांना आपण प्रचंड मतांनी विजयी करावं. निवडणुकीची ही वेळ पुन्हा येणार नाही. हा नूतन भारत निर्माण करण्याचा यज्ञ आहे आणि त्यात आपण मतदान करून आपले योगदान द्यावे!" असे मंत्री लोढा यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. तसेच जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी मतदानासाठी यावे आणि मोदीजींना पुन्हा एका पंतप्रधान म्हणून जबाबदारी द्यावी असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार