सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

धाराशिवमध्ये मराठा समाजाचे पोलिसांच्या लाठीमाराच्या निषेधार्थ आंदोलन

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या धाराशिव येथील कार्यक्रमात पोलिसांनी लाठीमार केला.

Shruti Patil
  • May 16 2024 8:52AM

धाराशिव: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या धाराशिव येथील कार्यक्रमात पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील रस्त्यांवर टायर जाळले, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. यानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन निषेध नोंदवत जोरदार घोषणा दिल्या.

 
पोलीस अधिकार्‍यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन डीजेवर लाठी मारून तो फोडण्याचा प्रयत्न केला. याचा निषेध म्हणून आम्ही छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती ठेवून शांततेत आंदोलन करत होतो. या वेळी राठोड साहेबांनी मूर्तीला हार आणि शाल अर्पण केला आणि थेट तेथील शिवभक्तांवर लाठीमार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार