सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मीरारोड येथे आणखी एक लव्ह जिहादमुळे बलात्काराची धक्कादायक घटना; जिहादीने हिंदू मुलीला मुस्लिम धर्म स्वीकारण्याची सक्ती करून केस कापून केले विद्रूप!

मीरा रोडमध्ये रहाणार्‍या २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्याची सक्ती केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Shruti Patil
  • Apr 28 2024 7:31PM

वसई: मीरा रोड येथे रहाणार्‍या २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्याची सक्ती केल्याचा प्रकार समोर आला आहे. तिची अश्लील छायाचित्रे काढून तिच्याकडून लाखो रुपये उकळण्यात आले होते. तसेच तिचे केस काढून तिला विद्रुप करण्यात आले होते. या प्रकरणी नयानगर पोलिसांनी ६ जणांच्या विरोधात फसवणूक, बलात्कार, विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे नोंद केले आहेत.

ऑक्टोबर २०२३ मध्ये तिची ओळख कल्याण येथे राहणार्‍या मोहसीन शेख (२२) याच्यासमवेत झाली होती. त्याने तिला गुंगीकारक पदार्थ टाकून बिर्याणी खायला दिली होती. यानंतर पीडित तरुणी बेशुद्ध झाल्यानंतर मोहसीन याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिची अश्लील छायाचित्रे काढली. यानंतर तो तिच्याशी वारंवार बळजोरी करून शरीरसंबंध प्रस्थापित करत होता. यानंतर तिला इस्लाम धर्म स्वीकारण्याची सक्ती करू लागला. तिने नकार दिल्यावर सतत तिला मारहाण करू लागला. तिच्या डोक्यावरील केसही काढून तिला विद्रुप केले होते. तिच्याकडून पावणेतीन लाख रुपयेही उकळले, असा आरोप तिने तक्रारीत केला आहे.
 
आरोपी मोहसीन शेख याचे भाऊ जाफर, मोबिन आणि मेव्हणा अश्फाक शेख यांनी तिचा विनयभंग केला होता. काका इम्रान बागवान याने तिला मारहाण केली. आरोपी मोहसीन याची आई शहनाज हिनेही इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार