सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त विधान भवन येथे ध्वजारोहण

६५ व्या स्थापना दिनानिमित्त विधान भवनाची देखणी वास्तू पूर्वसंध्येला नेत्रदीपक विद्युत रोषणाईने उजळून निघाली.

Shruti Patil
  • May 1 2024 9:49AM
मुंबई: महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ८ वाजता ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. 
 
६५ व्या स्थापना दिनानिमित्त विधान भवनाची देखणी वास्तू पूर्वसंध्येला नेत्रदीपक विद्युत रोषणाईने उजळून निघाली. ध्वजारोहण सोहळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती मा.डॉ.नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे तसेच महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव (१) (कार्यभार) श्री.जितेंद्र भोळे, सह सचिव श्रीमती मेघना तळेकर, श्री.शिवदर्शन साठ्ये, उप सचिव श्री.राजेश तारवी, श्री.उमेश शिंदे, उप सचिव (विधी) श्रीमती सायली कांबळी, अवर सचिव श्री.विजय कोमटवार, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र, जनसंपर्क अधिकारी, श्री.निलेश मदाने यांच्यासह विधानमंडळाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी श्री.प्रदिप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार