नवी दिल्ली:
देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शेकडो लोक, नेते आणि केंद्रीय मंत्री यांनी अटलजींच्या समाधीचे अटल स्मारकावर दर्शन घेतले. यावेळी वाजपेयी यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली. यावेळी राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्यासह गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, प्रफुल्ल पटेल, जितनराम मांझी, अनुप्रिया पटेल, सुदेश महतो हे ही उपस्थित होते.
यावेळी मोदी म्हणाले की, त्यांच्या नेतृत्वाचा भारताला खूप फायदा झाला. भारताच्या अनेक क्षेत्रात प्रगती करण्यात आणि २१व्या शतकात नेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारताच्या 140 कोटी जनतेसह मी अटलजींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करतो.