सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे

Donation

भारतीय नौदलाने अण्वस्त्रवाहू के - ४ क्षेपणास्त्राची केली चाचणी यशस्वी; ३,५०० किमीचा पल्ला

भारतासह जगात फक्त 6 अण्वस्त्रधारी देश आहेत. ही चाचणी व्यापक आण्विक प्रतिकारक्षमता विकसित करण्याच्या भारताच्या योजनेमधील मैलाचा दगड ठरणार आहे.

Sudarshan MH
  • Nov 29 2024 12:18PM

वृत्तसंस्था, नवी दिल्ली...

भारतीय नौदलाने बुधवारी के - ४ अण्वस्त्रवाहू बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. यामुळे भारताची आण्विक प्रतिकारक्षमता आणि संरक्षणसिद्धता अधिक वाढली आहे. नौदलाच्या ‘आयएनएस अरिघात’ या अणुऊर्जासंचिलात पाणबुडीमधून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. ते ३,५०० किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा भेद करू शकते. या चाचणीमुळे शत्रूने अण्वस्त्र हल्ला केल्यास याद्वारे त्याला प्रभावी प्रत्युत्तर देता येणार आहे. तसेच सागरी हद्दीच्या पलिकडेही देशाच्या सीमांचे संरक्षण करणे शक्य होणार आहे.

आतापर्यंत भारतीय नौदलाने तीन आण्विक पाणबुड्या तयार केल्या आहेत. यापैकी एक अरिहंत कार्यान्वित झाली आहे, दुसरी अरिघात प्राप्त होणार आहे आणि तिसऱ्या S3 ची चाचणी सुरू आहे. या पाणबुड्यांद्वारे शत्रू देशांवर आण्विक क्षेपणास्त्रे डागता येतात. 2009 मध्ये प्रथमच, INS अरिहंत हे कारगिल विजय दिवसानिमित्त माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पत्नीने प्रतिकात्मकरित्या लॉन्च केले होते. यानंतर 2016 मध्ये नौदलाच्या ताफ्यात त्याचा समावेश करण्यात आला. भारतीय नौदलाने पुढील 5 वर्षांत आणखी दोन पाणबुड्या दाखल केल्या आहेत. 2009 मध्ये लॉन्च करण्यापूर्वी भारताने पाणबुड्या जगापासून लपवून ठेवल्या होत्या. 1990 मध्ये, भारत सरकारने ATV म्हणजेच प्रगत तंत्रज्ञान जहाज कार्यक्रम सुरू केला. त्याअंतर्गतच या पाणबुड्या बांधण्याचे काम सुरू झाले.

14 ऑक्टोबर 2022 रोजी अरिहंतने ज्या प्रकारे चाचणी केली होती त्याच प्रकारे INS अरिघात पाण्याखालील क्षेपणास्त्र हल्ले करण्यास सक्षम आहे. त्यानंतर अरिहंतकडून K-15 SLBM ची यशस्वी चाचणी घेण्यात आली. यासह भारत अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन व्यतिरिक्त जगातील सहावा अणु त्रय देश बनला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार