लोकसभेत हनुमान चालीसा म्हणत खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी आज लोकसभेत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला
सावरकरांच्या विचारांवर शिवसेना पक्षाची स्थापना झाली, त्या सावरकरांचे विचार बाळासाहेब ठाकरे सुद्धा मानत होते:-खासदार.डॉ.श्रीकांत शिंदें....
नवी दिल्ली - 'आज अविश्वास प्रस्तावाची चर्चा नसून अविश्वास विरुद्ध जनविश्वास अशी चर्चा आहे, आणि तुमच्या विरुद्ध तर जनतेनेच दोन वेळा अविश्वास प्रस्ताव पारित केला आहे, आता २०२४ मध्ये त्याची हॅटट्रिक होणार आहे', अशा शब्दात खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी आज लोकसभेत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. विरोधकांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर शिवसेनेची भूमिका मांडताना खासदार शिंदे यांनी ही टीका केली. सोबतच चक्क लोकसभेत हनुमान चालीसा म्हणत त्यांनी विरोधकांचा आवाज बंद केला.
तुम्ही अविश्वास प्रस्ताव दाखल केला असला, तरी जनविश्वास एनडीए सोबतच आहे. २०१४ मध्ये जनतेने तुम्हाला ट्रेलर दाखवला, २०१९ मध्ये पिक्चर दाखवला आणि आता २०२४ मध्ये जनता तुम्हाला ब्लॉकबस्टर दाखवेल, अशा शब्दात खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनी विरोधकांचा समाचार घेतला. विरोधकांना युपीए नावाची लाज वाटते, कारण युपीएचं नाव घेताच त्यांनी केलेले घोटाळे डोळ्यासमोर येतात. त्यामुळेच विरोधकांनी आपलं नाव बदलून इंडिया केल्याची टीका खासदार श्रीकांत शिंदेंनी केली. २००४ ते २०१४ या १० वर्षात युपीए १ आणि युपीए २ सरकारांनी देशावर राज्य केलं, पण या काळात देशाला घोटाळे सोडून काहीही मिळालं नाही. देशाच्या प्रत्येक मोठ्या शहरात या काळात दहशतवादी हल्ले झाले. या हल्ल्यांच्या वेळी कोण 'मौन' पाळून होतं? असा सवाल करत त्यांनी विरोधकांना उत्तर दिलं. आता पुन्हा इंडिया नावाने २६ विरोधी पक्ष एकत्र आले असले, तरी यात सगळ्यांनाच पंतप्रधान होण्याची इच्छा आहे, टीमचा कॅप्टन म्हणून कुणालाही निवडलेलं नाही, मग तुमची टीम जिंकणार कशी? असा टोला खासदार श्रीकांत शिंदेंनी विरोधकांना लगावला.
मणिपूर घटनेप्रकरणी अधिवेशनात गदारोळ घालण्यावरूनही त्यांनी विरोधकांना उत्तर दिलं. २०१४ साली ईशान्येकडील ७ पैकी ४ राज्यांमध्ये काँग्रेस, तर एका राज्यात डाव्या पक्षांचं सरकार होतं. मात्र आज ही सगळी राज्यं एनडीएसोबत आहेत. काँग्रेसने या राज्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळेच या राज्यांनी काँग्रेसची साथ सोडून एनडीएला समर्थन दिलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आत्तापर्यंत तब्बल ५० वेळा ईशान्येकडील राज्यांमध्ये गेल्याचं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. ईशान्येकडील राज्यांमध्ये गेल्या ९ वर्षात केंद्र सरकारनं काय कामं केली याची यादीच खासदार शिंदेंनी लोकसभेत वाचून दाखवली.
तर महाराष्ट्रातही २०१९ साली १३ कोटी जनता आणि एनडीएच्या मतदारांशी गद्दारी करून महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आल्याची टीका श्रीकांत शिंदेंनी केली. कोरोना काळात एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांसाठी लस उपलब्ध करून देत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मात्र अडीच वर्षात फक्त फक्त अडीच दिवस मंत्रालयात जाऊन गिनीज रेकॉर्ड केल्याचा टोला त्यांनी लगावला. तसंच मुंबई महापालिकेत कोरोनाकाळात झालेल्या मोठ्या भ्रष्टाचाराप्रकरणी तत्कालीन महापौरांवर गुन्हा दाखल झाल्याचं सांगत मुंबई महापालिकेने मृतांच्या बॉडीबॅगमध्येही मोठा घोटाळा केल्याचा आरोप खासदार शिंदेंनी केला. महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्रात हनुमान चालीसा म्हणायलाही बंदी होती, हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं, असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. दरम्यान, हा मुद्दा सुरू असतानाच तुम्हाला हनुमान चालीसा म्हणता येते का? असं आव्हान विरोधी बाकावरून देण्यात आलं. त्यावर क्षणाचाही विलंब न करता खासदार श्रीकांत शिंदेंनी लोकसभेतच हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली, त्यावर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी बाके वाजवत त्यांना समर्थन दिले. ज्या सावरकरांच्या विचारांवर शिवसेना पक्षाची स्थापना झाली, त्या सावरकरांचे विचार बाळासाहेब ठाकरे सुद्धा मानत होते. आज त्याच सावरकरांना जे शिव्या देतात, त्यांच्याच मांडीवर काही लोक जाऊन बसले आहेत, असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाच्या खासदारांना लगावला.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प