सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गणपती व इतर देवी - देवतांच्या छायाचित्रांचे घिबली आर्ट करू नका; लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचे आवाहन

तंत्रज्ञानाचा किंवा या आर्टचा गैरवापर करून व्यंगात्मक विडंबन होण्याची शक्यता नाकारात येत नाही त्यामुळे गणपती व इतर देव – देवतांच्या छायाचित्रांचे ‘घिबली आर्ट’ करू नका, असं आवाहन लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने केले आहे.

Sudarshan MH
  • Apr 3 2025 2:48PM

मुंबई: सध्या सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच घिबलीचे वेड लागले आहे. घिबली आर्टमधील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सगळ्यांना या आर्टबद्दल एक कुतूहल निर्माण झाले आहे. या कुतूहलापोटी अनेकजण गणपतीच्या छायाचित्रांचेही घिबली आर्टमध्ये रूपांतर करीत आहे. मात्र या तंत्रज्ञानाचा किंवा या आर्टचा गैरवापर करून व्यंगात्मक विडंबन होण्याची शक्यता नाकारात येत नाही त्यामुळे गणपती व इतर देवी - देवतांच्या छायाचित्रांचे ‘घिबली आर्ट’ करू नका, असं आवाहन लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने केले आहे.

 
कुतूहल आणि उत्सुकतेपोटी अनेकजण मुंबईच्या गणेशोत्सवातील विविध छायाचित्रे आणि विशेषतः सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींच्या फोटोंचे घिबली आर्ट करत आहेत, इतर देवांचेही फोटो घिबलीमध्ये करून ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत.
 
त्यामुळे आता लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने समाजमाध्यमांवर एक निवेदन प्रसिद्ध करत आवाहन केलं आहे. त्यांनी निवेदनात म्हटलं आहे, की ‘मुंबईच्या राजाच्या सर्व भक्तांना आदरपूर्वक आवाहन! आपणा सर्वांना ज्ञात आहे की, मुंबईचा राजा आणि इतर देवता आपल्या सर्वांच्या आस्थेचे आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. देवतांच्या चित्रांमध्ये पवित्रता आणि पावित्र्य असते. सध्या समाजमाध्यमांवर काही लोक गणपतीच्या छायाचित्रांचे ‘घिबली आर्ट’ तयार करत आहेत, जे योग्य वाटत नाही. सर्वांना नम्र विनंती आहे की, कृपया गणपतीच्या छायाचित्रांचे ‘घिबली आर्ट’ तयार करू नये किंवा ज्यांनी तयार केले असेल, त्यांनी ते समाजमाध्यमांवरून काढून टाकावे. अशा प्रकारच्या ‘एआय’ ॲपमध्ये व्यंग्यात्मक विडंबन होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे नकळतपणे आपण आपल्याच देवाचा अपमान करतो. गणपतीच्या मूर्तीचे असे रूपांतर करणे योग्य नाही’. असं म्हणत त्यांनी देवी-देवतांच्या फोटोंची घिबली करू नये अशी विनंती केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार