नागपूर: नागपूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. औरंगजेबच्या कबरीवरून आता वाद विकोपाला गेला आहे. नागपुरात दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाली असून नागपूरच्या महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीवरून राडा झाला आहे. दोन गट समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं. वाद टोकाला पोहोचला आणि दोन्ही गटामध्ये दगडफेक सुरू झाली. दगडफेकीत पोलीस जखमी झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. दगडफेकीत अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, या घटनेनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांततेच आवाहन केलं आहे.
या दगडफेकीनंतर पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन सुरु केले आहे. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. या ठिकाणांवरुन अनेक जणांना ताब्यात घेतले आहे. या ठिकाणी आता परिस्थिती नियंत्रणात आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन पोलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांनी केले आहे. आमच्याकडे एक एसआरपीएफची कंपनी होती इतर तीन कंपन्या बोलविण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.