सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नागपूरमध्ये सोशल मीडियावर रिल्स बनवणाऱ्यांना पोलिसांनी दिली सक्त शब्दांत ताकीद

नागपूर हिंसाचार प्रकरणी जिहादी फहीम खान हा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. फहीम खानने जमावाला भडकवून हिंसा घडवल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. सध्या जिहादी फहीम खान हा कोठडीत आहे.

Sudarshan MH
  • Mar 26 2025 10:03AM

नागपूर: नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी मोठा हिंसाचार उसळला होता. यानंतर पोलिसांनी ५० दंगलखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी फहीम खानलाही १८ मार्चला अटक करण्यात आली आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणी जिहादी फहीम खान हा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. फहीम खानने जमावाला भडकवून हिंसा घडवल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. सध्या जिहादी फहीम खान हा कोठडीत आहे. या हिंसाचार प्रकरणातील मुख्य सूत्रधार फहीम खानच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्यात आली. नागपुरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर आता पोलीस आयुक्तांनी काही सूचना जारी केल्या आहेत.

नागपुरात झालेल्या हिंसाचारानंतर आता पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांना विविध सूचना दिल्या. तसेच रिल्स बनवणाऱ्यांनाही त्यांनी सक्त शब्दांमध्ये ताकीद दिली आहे. नागपूर हिंसाचाराच्या घटनेनंतर युट्यूबवर लोकांना माहिती देताना हिंसाचाराचे व्हिडीओ पोस्ट करू नये, जेणेकरून दोन समाजात तेढ निर्माण होईल. कोणाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असे व्हिडीओ पोस्ट करू नये. युट्यूबवर आमची नजर असणार आहे. यापुढे अशा पद्धतीचे काही असल्यास कारवाई केली जाणार आहे. यामध्ये 114 च्या पेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेतलेले आहे. यातील 13 लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच आणखी लोकांना अटक करण्यात येत आहे. त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगळे गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी दिली.

 

सोशल माध्यमांना नजर ठेवण्यासाठी वेगळे लक्ष ठेवू नये. काही युट्युबवर कारवाई केली जाणार आहे. ज्या गुन्हेगारांवर कडक कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी आम्ही गुन्हे दाखल केले आहेत. अवैध बांधकाम असल्यास नियमितपणे कारवाई करत असतो. गुन्हेगाराची जात किंवा धर्म नसते. ज्या लोकांचे नाव निष्पन्न होईल, त्यावरही अशाच पद्धतीची कडक कारवाई केली जाईल, असेही पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार