सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला शोधण्यासाठी १३ पथके तैनात; १ लाखांचं बक्षिस जाहीर!

आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी १३ पथके तैनात केली असून त्याच्या आई - वडिल आणि भावाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

Sudarshan MH
  • Feb 27 2025 4:13PM

पुणे: पुण्यातील स्वारगेट या अत्यंत गजबजलेल्या एसटी स्थानकात मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला. हे बलात्कार प्रकरण बुधवारी सकाळी उजेडात आल्यानंतर विरोधक, विविध संघटना, सामान्य माणसं आणि महिला कार्यकर्त्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटली आहे. त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी १३ पोलीस पथके तैनात केली आहेत. तसेच आरोपीला शोधून देणाऱ्याला १ लाखांचं बक्षिसही जाहीर करण्यात आले आहे.

सीसीटीव्ही फुटेज आणि पीडित तरुणीने केलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आहे. त्याचं नाव दत्तात्रय रामदास गाडे (३५) आहे. तो पुण्यातील शिरूर तालुक्यातील गुनाट येथे राहणारा आहे. त्याच्याविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४, ३५१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
 
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडेविरोधात पुणे आणि अहिल्यानगर पोलीस ठाण्यात अर्ध्या डझनहून अधिक चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सोनसाखळी चोरीचेही प्रकरण त्याच्यावर नोंद आहेत. २०१९ मध्ये तो एका चोरीच्या प्रकरणातून तुरुंगातून जामिनावर सुटला आहे. तसंच, २०२४ मध्येही पुण्यात त्याच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.”
 
आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी १३ पथके तैनात केली असून त्याच्या आई - वडिल आणि भावाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तर, त्याच्या मैत्रिणीला ताब्यात घेऊन तिचीही चौकशी करण्यात आली. तसंच, त्याच्या १० मित्रांचीही चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीच्या आधारे पोलीस त्याच्या मागावर आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार