सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुण्यातील भोर येथील वसईच्या विजयाचे प्रतीक असलेल्या बनेश्वर मंदिरच्या दीड किलोमीटरच्या रस्त्यासाठी खा. सुप्रिया सुळेंचं उपोषण

भोर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गात लगत आणि नसरापूरपासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे.

Sudarshan MH
  • Apr 10 2025 11:23AM

पुणे: पुण्यातील भोर तालुक्यातील श्रीक्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडं जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. त्याचं क्रॉंक्रिटीकरण करावं, यासाठी सातत्यानं पाठपुरावा होऊनही या रस्त्याचं काम सुरु झालं नाही. याविरोधात काल दि. ९ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खा. सुप्रिया सुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसल्या होत्या. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय येथे श्रीक्षेत्र बनेश्वर देवस्थानचे ट्रस्ट मंडळी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) कार्यकर्ते उपस्थित होते.

गेल्या कित्येक महिन्यापासून या रस्त्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. पण दीड किलोमीटरच्या रस्त्याचं काम होत नाही. बनेश्वर हे आमच्या श्रद्धेचा विषय असून या रस्त्याचं काम व्हायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. मात्र, तसं घडतांना दिसत नाही. या रस्त्याचं काम व्हावं यासाठी शासनाकडं देखील पाठपुरावा केला आहे. मात्र, रस्त्याचं काम झालं नाही. भिजत घोंगडं राहिलेलं काम पूर्ण व्हावं म्हणून बेमुदत उपोषणाच्या आंदोलनाचं अस्त्र उगारावं लागल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार