प्रतिनिधी:_पुणे
पुणे:-विश्व श्री राम सेना सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांना सामाजिक कार्यात डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. लालबाबू गुप्ता यांनी गेल्या अनेक वर्षांत सामाजिक बांधिलकी जोपासली. एव्हढेच काय तर त्यांनी आपल्या परोपकारी कार्यांद्वारे देशभरात अनोखा ठसा उमटविला आहे. लालबाबू यांच्या सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत या उच्च सन्मानाने नुकतेच त्यांना गौरविण्यात आले. सामाजिक कार्यातील डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली. नवी दिल्ली येथे झालेल्या एका सर्वसाधारण परिषदेत त्यांना कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ द किंगडम ऑफ टोंगाकडून ही पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. दिल्लीत झालेल्या दीक्षांत समारंभात विद्यापीठातर्फे त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
लालबाबू गुप्ता गेल्या अनेक वर्षांपासून विश्व श्री राम सेना सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाजसेवा करत आहेत. त्यांच्या संस्थेने अनेक मुलींचे लग्न लावून दिले, तसेच समाजातील गोरगरीबांच्या मदतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. देशातील अनेक राज्यांत त्यांचे हे कार्य निस्वार्थीपणे सुरू आहे. शिक्षण, पर्यावरण संरक्षण, उपजीविका, आरोग्य, ग्रामविकास, महिला व बालविकास, ग्रामीण रोजगार, शेतकरी कल्याण, शेतकरी कल्याण, निष्पक्ष पत्रकारिता, संस्कृती संवर्धन-सुशासन अशा विविध क्षेत्रात लालबाबू सध्या कार्यरत आहेत.
यावेळी बोलताना, राष्ट्रीय अध्यक्ष लालबाबू गुप्ता म्हणाले की, देशाच्या विविध भागांच्या दौऱ्यात त्यांना जाणवले की, गरिबांचे जीवनमान उंचावण्यासाठी खूप काम करण्याची गरज आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा विकास झाला तरच सामाजिक विकास शक्य आहे. म्हणूनच या कामात आम्ही मनापासून सहभागी आहोत. आणि आज या कार्यामुळे हा मोठा सन्मान मिळणे हे मी माझे सौभाग्य समजतो. या सन्मानामुळे माझ्या कामाचा उत्साह वाढला आहे. मला अनोखी उर्जा प्राप्त झाली आहे. यापुढेही आमच्या सामाजिक कार्याचा झंझावात कायम राहणार आहे. राष्ट्रीय एकता आणि राष्ट्र विकास हे आमचे ध्येय आहे.