Crop insurance scheme scam: एक रुपया पीकविमा योजनेत घोटाळा झाल्याने राज्यभर शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच योजनांबद्दल कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा शेतकऱ्यांना दिला आहे. इंदापूर येथील कृषी प्रदर्शनात उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी, दि. २६ रोजी बोलत होते. यावेळी त्यांनी पीक विमा योजनेतील घोटाळ्याबाबत कारवाई करण्याचे संकेतही दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की "चांगल्या योजना सरकार देण्याचा प्रयत्न करतं, पण त्याचा गैरफायदा घेतला जातो. एक रुपयांत पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात गडबड झाल्याचं कानावर येत आहे. त्याची चौकशी सुरू आहे. परंतु असं जर घडलं तर नाईलाजस्तव आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतात." असा इशारा अजित पवारांनी दिला आहे. अजित पवार म्हणाले, "चांगल्या योजना सरकार देण्याचा प्रयत्न करतं, पण त्याचा गैरफायदा घेतला जातो. एक रुपयांत पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात गडबड झाल्याचं कानावर येत आहे. त्याची चौकशी सुरू आहे. परंतु असं जर घडलं तर नाईलाजस्तव आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतात." असा इशारा अजित पवारांनी दिला आहे.