शिर्डी: आज दि. ९ मार्च रोजी परीट समाजाचे महा अधिवेशन महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाच्या वतीने सप्तपदी लॉन्स, शिर्डी येथे संपन्न झाले. या महा अधिवेशनाला. सुदर्शन न्यूज चॅनलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्री. सुरेश चव्हाणके समाजाच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले होते.
यावेळी त्यांनी उपस्थित असलेल्या संपूर्ण समाजाला आवाहन केले, की पारंपरिक व्यवसाय सोडू नको. आपले व्यवसाय आपली ओळख आहे. त्यांच्यावर अधर्मीय लोकं कब्जा करत आहेत. संपूर्ण बाजार ते हळू - हळू ताब्यात घेत आहेत. त्यामुळं व्यवसायांवर लक्ष केंद्रित करा. हिंदूंनी हिंदूंकडूनचं खरेदी करा. आणि एकमेकांना आर्थिक फायदा करून द्या. एकंदरीत अधर्मीय लोकांवर आर्थिक बहिष्कार टाकून हिंदू व्यावसायिक, ग्राहक वाढवण्यास त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी परीट समाजाचे राज्यभरातून आलेले हजारो समाज बांधव उपस्थित होते. या निमित्ताने परीट समाजाचे आलेले अनेक बांधव चव्हाणके यांना भेटले. त्यांच्याकडे लोकांनी समस्या मांडल्या व त्यावर मदत करण्याचे आश्वासन देखील डॉ. सुरेश चव्हाणके यांनी दिले.