सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भाजप आमदार महेश लांडगे यांना जिवे मारण्याची धमकीचा फोन

भोसरी विधानसभेचे चे भाजपा आमदार महेश लांडगे यांना एका व्यक्तीने जिवे मारण्याची धमकी दिली.

Sudarshan MH
  • Sep 8 2024 8:26PM
पुणे: राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भोसरी विधानसभेचे चे भाजपा आमदार महेश लांडगे यांना एका व्यक्तीने जिवे मारण्याची धमकी दिली. त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उदयकुमार राय (रा. भोसरी. मूळ रा. छत्तीसगड) असे ताब्यात घेतलेल्या संशयित व्यक्तीचे नाव आहेमिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी उदयकुमार राय नावाच्या व्यक्तीने पिंपरी चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. आमदार महेश लांडगे यांची सुपारी मला मिळाली असल्याचे त्याने नियंत्रण कक्षात फोन करून सांगितले. त्यानंतर पोलिसांची एकच धावपळ उडाली. पोलिसांनी तत्काळ तांत्रिक विश्लेषण करून फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीचा ठावठिकाणा शोधला आणि त्याला ताब्यात घेतले.
 
याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. उदयकुमार हा मागील पाच वर्षांपासून भोसरी परिसरात राहत आहे. त्याने अशा प्रकारचा फोन का केला, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार