कोल्हापूर: मध्यवर्ती बसस्थानकात उतरल्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे निघालेले साहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे यांना खासगी ट्रॅव्हल्सच्या एजंटनी बेदम मारहाण केली. हा प्रकार २८ जानेवारीला रात्री ११.३० वाजता महालक्ष्मी चेंबरसमोर घडला. विशाल मुळे यांच्या तक्रारीनुसार, जिहादी अकिब पठाण, दिलदार मुजावर आणि जावेद मुजावर या तिघांवर गुन्हा नोंद झाला आहे. तसेच या तिघांपैकी दिलदार मुजावर आणि जावेद मुजावर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
विशाल मुळे हे शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे जातांना महालक्ष्मी चेंबरसमोर खासगी ट्रॅव्हल्सचा एजंट अकिब पठाण धावत आला. ‘पुण्याला जाणारी ट्रॅव्हल्स लागली आहे’, असे म्हणत तो हाताला धरून ओढू लागला. विशाल मुळे यांनी त्याला स्वतः पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले. तरीही तो बसपर्यंत ओढून घेऊन गेला. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. विशाल मुळे हे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना भ्रमणभाषवरून घडलेल्या प्रकाराची माहिती देत असतांना तिघांनी त्यांना बेदम मारहाण केली. विशाल मुळे हे साध्या वेशात होते. आपण पोलीस अधिकारी असल्याचे ते ओरडून सांगत होते; पण पोलीस आहेस ना? तुला बघून घेतो, असे म्हणत तिघांनी त्यांना मारहाण केली.