मलकापूर: मलकापूर येथील नांदुरा हायवेला लागून नॅशनल हायवे क्रमांक 53 वरील मातोश्री जिनिंग प्रेसिंग मधील कापसाच्या सहा ते सात गंज्यांना आग लागल्यामुळे एक ते दीड कोटी चे नुकसान ही घटना दि. 25 फेब्रुवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास झाल्याची माहिती मिळाली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलानी विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. तसेच फॅक्टरी मधील कामगार व स्थानिक रहिवासी यांनी सुद्धा आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
फॅक्टरीमध्ये आग कशामुळे लागली? याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. मागच्या वर्षी सुद्धा या मातोश्री जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये अशाच प्रकारे अचानक आग लागली होती. यावरून विविध चर्चांना उधान येत आहे.
सुदर्शन न्यूज मराठी प्रतिनिधी - अनिलकुमार गोठी (मलकापूर)...