सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील गांजा शेती उद्ध्वस्त करून ७६ लाखांची झाडे जप्त; शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई, दोन जण अटकेत

वन जमिनीवर गांजा या अंमली पदार्थयुक्त वनस्पतीची लागवड केली जाते. त्याविरोधात गोपनिय माहिती काढुन अशा पिकांची लागवड करणार्‍या व त्याला प्रोत्साहन देणार्‍यांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले होते.

Sudarshan MH
  • Jan 31 2025 12:58PM

धुळे: शिरपूर तालुक्यातील दुर्गम भागातील बोरमळीपाडा गावाजवळील भोईटी शिवारातील वन जमिनीवरील गांजा शेती शिरपूर तालुका पोलिसांनी कारवाई करीत उद्ध्वस्त केली आहे. या कारवाईत एकूण ७६ लाखांची गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत. तसेच गाजांची लागवड करीत पिकांची राखण करणार्‍या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
वन जमिनीवर गांजा या अंमली पदार्थयुक्त वनस्पतीची लागवड केली जाते. त्याविरोधात गोपनिय माहिती काढुन अशा पिकांची लागवड करणार्‍या व त्याला प्रोत्साहन देणार्‍यांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले होते. त्यानुसार माहिती काढत असतांना शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना काल दि. २८ रोजी गोपनिय माहिती मिळाली, की बोरमळीपाडा गावाजवळ भोईटी शिवारात वनजमिनीवर संतोष ग्यानसिंग पावरा (रा. बोरमळीपाडा (भोईटी) पो. रोहीणी ता. शिरपूर) व रामप्रसाद हुरजी पावरा (रा. भोईटी ता. शिरपूर) यांनी गांजाची लागवड केली आहे. त्यावरुन निरीक्षक हिरे यांनी पोलीस अधीक्षकांच्या परवानगीने कायदेशीर प्रक्रिया राबवुन त्या शेतावर छापा टाकला. तेथे गांजा पिकाची लागवड करुन राखण करतांना वरील दोघे मिळून आले.
 
दरम्यान, त्या ठिकाणावरून जवळच काही अंतरावर असलेल्या वन जमिनीवर भावसिंग काशिराम पावरा (रा. बोरमळीपाडा ता. शिरपूर) याने देखील गांजा पिकाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तेथे पथकाने पाहणी केली असता गांजाची शेती मिळून आली. पोलिसांची चाहुल लागताच भावसिंग पावरा हा पळुन गेला. ही शेती देखील रामप्रसाद पावरा व संतोष पावरा यांनी संगनमताने केली असल्याचे चौकशीत समोर आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार