सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुण्यातून हवालाद्वारे जाणारे ४ लाख १०० अमेरिकन डॉलर जप्त, महिलेसह जिहाद्याला अटक; केंद्रीय सीमाशुल्क विभागाची कारवाई

जिहादी आरोपी महंमदच्या घरातून १७ देशांचे चलन जप्त करण्यात आले आहेत.

Sudarshan MH
  • Feb 27 2025 8:57AM

पुणे: हवालाद्वारे दुबईला परदेशी चलन घेऊन निघालेल्या खुशबू आगरवाल आणि जिहादी महंमद आमीर या दोघांना केंद्रीय सीमाशुल्क विभागाच्या पथकाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली आहे. त्यांच्याकडून ४ लाख १०० अमेरिकेन डॉलर (३ कोटी ४८ लाख ६४ सहस्र ५८१ रुपये) जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या परदेशी चलनाचे मूल्य भारतीय चलनांमध्ये ३ कोटी ५० लाख रुपये असे होत आहे. जिहादी आरोपी महंमदच्या घरातून १७ देशांचे चलन जप्त करण्यात आले आहेत.जिहादी आरोपी महंमदच्या घरातून १७ देशांचे चलन जप्त करण्यात आले आहेत.

पुण्यातून दुबईला जाणाऱ्या ३ महिलांना खुशबू यांनी दुबईला पाकीट पोहोचवण्यास सांगितले होते. दुबईतील विमानतळावर पडताळणी करतांना त्यांच्याकडे ती रक्कम सापडली. त्या महिलांना त्याविषयी काहीच ठाऊक नव्हते. त्यांना त्वरित पुण्यास माघारी पाठवले. पुण्यात आल्यानंतर त्यांच्याकडे अधिक चौकशी केली तेव्हा खुशबू यांचे नाव समोर आहे. पुढील अन्वेषणातून जिहादी महंमद यालाही अटक करण्यात आली आहे. या दोघांनी आतापर्यंत भारतीय चलनातील १६ कोटी ६० लाख रुपये हवालामार्फत दुबईला पाठवल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यासाठी त्यांनी दुबईला १४ ते १५ फेर्‍या मारल्या आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार