छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा येथील जिहादी अफरोझ नजीर पठाण या तरुणाने इन्स्टाग्रामवर छत्रपती संभाजी महाराजांची अपकीर्ती करणारा आणि औरंगजेबाचे गुणगान करणारा आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केला. यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘आरोपीवर जोपर्यंत गुन्हा नोंद होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही’, अशी ठाम भूमिका शिवभक्तांनी घेतली होती. त्यामुळे पोलिसांनी आरोपी तरुणावर गुन्हा नोंदवला आहे.
या वेळी मोठ्या संख्येने हिंदू तरुणांनी आंदोलनात सहभाग घेतला. बहुलखेडा येथे आरोपीच्या समर्थनार्थ काही मुस्लिम तरुण पुढे आले होते. आरोपी समर्थक गटातील मुस्लिम तरुणांच्या हातात तलवारी आणि दांडके दिसून आले. यावेळी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत जमाव पांगवला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर सोयगाव पोलीस ठाणे येथे पोलिसांनी जमलेल्या हिंदू तरुणांचे ऐकून न घेता गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तेथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.