श्रीरामपूर: श्रीरामपूर - बाभळेश्वर रस्त्यावरील इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपासमोर जावेद शेख हा खंडाळा (श्रीरामपूर) येथे विनापरवाना नशेच्या इंजेक्शनची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती श्रीरामपूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी २४ फेब्रुवारीला रात्री कारवाई करत जावेदला अटक केली. त्याच्याकडून परवाना नसलेले ३ सहस्र ३२ रुपयाचे टर्मिन इंजेक्शन, ८० सहस्र रुपयांची दुचाकी ताब्यात घेतली.
श्रीरामपूर पोलीस ठाण्यात चौकशी चालू असतांना मध्यरात्री दीड वाजता पोलिसांच्या हाताला झटका देऊन आरोपी पळून गेला. पळून जातांना त्याने पोलीस ठाण्याला बाहेरून कडी लावली. शेखवर गुन्हा नोंद करून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.