सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जगात एकच धर्म आहे तो म्हणजे मानवधर्म आणि हिंदू धर्म हाच मानवधर्म - आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत

जगात एकच धर्म मानव धर्म आहे आणि त्यालाच हिंदू धर्म म्हणतात असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हंटलं आहे.

Sudarshan MH
  • Apr 26 2025 7:43AM
मुंबई: जम्मू - काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांना लक्ष्य करुन आणि धर्म विचारुन गोळीबार करण्यात आला. यामध्ये २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यावरुन संपूर्ण देशभरातून रोष व्यक्त केला जात आहे. या हल्ल्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच जगात एकच धर्म आहे तो म्हणजे मानवधर्म आणि हिंदू धर्म हाच मानवधर्म असल्याचे देखील मोहन भागवत म्हणाले आहेत. विलेपार्ल येथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये सरसंघचालक मोहन भागवत हे भाषण करत होते.
 
यावेळी बोलतांना मोहन भागवत म्हणाले, की जगात एकच धर्म आहे तो म्हणजे मानव धर्म. त्यालाच हिंदू धर्म म्हणतात. आपल्या जवानांनी किंवा आपल्याकडच्या लोकांनी कधी कुणाला धर्म विचारून लोकांना मारलेले नाही. काल कट्टरपंथीयांनी जो उत्पात केला, तसा हिंदू कधीही करणार नाही. पण आपल्या संप्रदायाचा चुकीचा अर्थ लावणारे कट्टरपंथी असं करतील. त्यामुळेच आपला देश बलवान पाहिजे”, अशी भूमिका मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे.
 
तसेच पुढे ते म्हणाले, की आपल्या मनात दुःख आहे. सगळ्यांची अंतःकरण जड झाली आहेत. या सर्व कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. पण आमच्या मनात क्रोधही आहे. तो असला पाहिजे. असुरांचं निर्दालन व्हायचं असेल, तर अष्टादश भुजांची शक्ती असलीच पाहिजे. चांगलेपणा दुरुस्त करण्याचे सृष्टीचे जे मार्ग आहेत, त्यात एक मार्ग समजावून देण्याचा असतो. अनुभवातून मनुष्य शिकतो आणि सुधारतो. काही लोक असे असतात जे सुधरतच नाही. जे शरीर, मन त्यांनी धारण केलंय, त्यात परिवर्तन शक्य नसतं,” असे मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले. तसेच आक्रमक भूमिका घेतली आहे.

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार