मुंबई: मालाडमधील पठाणवाडीमध्ये गुढीपाडव्यानिमित्त काढलेल्या कलशयात्रेच्या वेळी भगवा झेंडा घेतलेल्या २ हिंदू तरुणांना ४० ते ५० जिहाद्यांनी मारहाण केली. या प्रकरणी बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. यानंतर ४ जणांना अटक करण्यात आली आहे. येथे २ हिंदूंचा जिहाद्यांसोबत वाद झाला. यावेळी त्या युवकांना मारहाण करण्यात आली. त्याचा व्हिडिओही प्रसारित झाला आहे. जिहाद्यांनी हिंदूंच्या हातातील भगवा झेंडा खेचण्याचाही या वेळी प्रयत्न केला.
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे मॉब लिचिंगचा गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करावी, अशी मागणी केली. पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली होती. पोलिसांना कारवाई करण्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी २ दिवसांची वेळ दिली होती. ‘आरोपींना अटक न झाल्यास तीव्र आंदोलन करू’, अशी चेतावणी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनी दिली होती. सध्या कुरार पोलीस ठाण्याबाहेर मोठा बंदोबस्त तैनात आहे.